¡Sorpréndeme!

Shivsena नाव आणि धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा आरोप | Sanjay Raut | Eknath Shinde

2023-02-19 10 Dailymotion

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. यावरुन राज्यात राजकारण तापलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. इतकेच नव्हे हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ट्विट करत राऊतांनी या गौप्यस्फोट केला आहे.

#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #PMModi #UddhavThackeray #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #AdityaThackeray #Maharashtra